२० वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदा व्यवसायावर कारवाई; इमारतीच्या गच्चीला टाळे

गेली २० वर्षे विनापरवाना कुलाब्यातील कमल मॅन्शन इमारतीच्या गच्चीवर चालविण्यात येत असलेल्या ‘कोयला हुक्का पार्लरवर अखेर पालिकेने गुरुवारी हातोडा चालविला. तसेच कमला मॅन्शनच्या गच्चीला पालिकेने टाळेही ठोकले. ‘कोयला’ तोडक कारवाईवर आलेला खर्च हुक्का पार्लरच्या मालकाकडून वसूल करण्यात येणार आहे.

kirit love jihad case
मुंबईत टॅक्सी चालकाकडून तरुणीची हत्या, किरीट सोमय्यांनी केला ‘लव्ह जिहाद’चा आरोप
Ban on use of drones due to Prime Minister visit to Pune print news
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामुळे ड्रोन वापरण्यास बंदी
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई

कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्रो’ या रेस्टोपबमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेला आणि त्यानंतर पालिकेने मुंबईमधील हॉटेल, रेस्तरॉ आणि पबच्या तपासणीची मोहीम हाती घेतली होती. ‘कोयला  हुक्का पार्लर’मध्येही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी ४.३० च्या सुमारास पाहणी केली आणि या पाहणीमध्ये कमल मॅन्शनच्या गच्चीवर हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळले नाही, असे या अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नमूद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे तक्रारदाराने पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे ‘ए’ विभाग कार्यालयाने ‘कोयला’ची पाहणी केली. या पाहणीमध्ये कमल मॅन्शनच्या गच्चीवर अनधिकृतपणे हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याचे आणि तेथे परवानगीशिवाय अन्नपदार्थ उपलब्ध करण्यात येत असल्याचे आढळून आले होते. पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला. मात्र तरीही ‘कोयला’विरुद्ध कारवाई करण्यात येत नव्हती.

या संदर्भात ‘लोकसत्ता, मुंबई’ या सहदैनिकात गुरुवारी ‘२० वर्षांनंतरही कुलाब्यातील हुक्का पार्लर अनधिकृत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत तात्काळ पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने कमल मॅन्शनच्या गच्चीवर चालविण्यात येत असलेल्या ‘कोयला हुक्का पार्लर’मधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. गच्चीवर केलेली पक्की आसन व्यवस्था, उभारलेले छप्पर आणि अन्य लाकडी साहित्य तोडून टाकले. तसेच पालिका अधिकाऱ्यांनी कमल मॅन्शनच्या गच्चीला टाळे ठोकले.

दोन वेळा पाहणी केल्यानंतर गच्चीवरील हुक्का पार्लर बंद करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र पालिकेची सूचना धुडकावून गच्चीवर हुक्का पार्लर सुरूच होते. त्यामुळे पालिकेने गुरुवारी कमल मॅन्शनच्या गच्चीवरील या हुक्का पार्लरवर कारवाई केली. तसेच इमारतीच्या गच्चीला टाळे ठोकण्यात आले.

किरण दिघावकर,साहाय्यक आयुक्त, ‘विभाग कार्यालय