कळव्यातील अशोकनगरमध्ये राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाचा शनिवारी याच भागातील न्यू शिवाजीनगर येथे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. भारत ऊर्फ मारू राठोड असे या मुलाचे नाव असून त्याच्या शरीरावर होरपळल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.
या भागातील सीसीटीव्ही फुटेजमधील माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरेश मानकवणे (४७) या चाळमालकाला अटक केली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरेश मारूचा मृतदेह फरफटत नेत असल्याचे आढळून आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मारूची हत्या कोणी केली, सुरेशशी त्याचा काही संबंध आहे का, याची चौकशी पोलीस करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2014 रोजी प्रकाशित
कळव्यात मुलाची हत्या
कळव्यातील अशोकनगरमध्ये राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाचा शनिवारी याच भागातील न्यू शिवाजीनगर येथे संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
First published on: 10-03-2014 at 04:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy found murdered in kalwa