मोदी सरकार पुन्हा बहुमताने सत्तेवर येणार अशा मतमोजणीच्या कलाने हर्षोल्हसित दलाल स्ट्रीटवर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सेन्सेक्सने पहिल्यांदाच ४० हजारांपुढे मुसंडी मारली. मात्र अपेक्षित कौलानंतर, बाजारातील उत्साहाची लाट ओसरत गेली आणि नफावसुलीमुळे प्रत्यक्षात २९९ अंशांच्या घसरणीसह सेन्सेक्सने दिवसाची अखेर केली. परिणामी, निफ्टी निर्देशांकही १२ हजारांच्या सार्वकालिक उच्चांकी शिखरावरून ४२७ अंश घरंगळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदी सरकार २०१४ साली सत्तेवर आले त्यावेळी मतमोजणीच्या दिवशी सेन्सेक्सचे पहिल्यांदाच २५,०००चे शिखर दिसले होते, यावेळच्या निकालाच्या दिवशी निर्देशांकाने ४०,००० ची अभूतपूर्व पातळी गाठली. तथापि, भाजपप्रणीत सरकार सत्तेवर येणार हे भांडवली बाजाराने गृहीतच धरले होते आणि याचे प्रत्यंतर मतदानोत्तर चाचणीचे आकडे आल्यावर दशकातील सर्वोत्तम १,४२१ अंशाच्या उसळीतून सोमवारी दिसून आले. उल्लेखनीय म्हणजे गुरुवारच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स उच्चांकापासून जवळपास तितकीच १,३१४ अंशांची घसरण दाखविताना दिसला. सेन्सेक्स बुधवारच्या तुलनेत २९८.८२ अंशांच्या तुटीसह ३८,८११.३९ वर, तर निफ्टी निर्देशांक ८०.८५ अंशांची घट दाखवीत ११,६५७.०५ पातळीवर दिवसअखेर स्थिरावला.

गुरुवारच्या प्रारंभिक दोन-अडीच तासांच्या व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांक प्रत्येकी दोन टक्क्यांपेक्षा अधिक वाढ राखून होते. त्यानंतर मात्र देशांतर्गत तसेच जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेच्या वास्तवाने बाजार भावनांना हात घातला. रुपयाच्या डॉलरमागील ७० च्या खाली घसरणीनेही चिंता वाढविल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse nse nifty sensex
First published on: 24-05-2019 at 01:44 IST