भिवंडी येथील निंबवली गावात राहणाऱ्या आत्माराम सखाराम गुळवी (५६) या बांधकाम व्यावसायिकावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली असून गोळीबारत जखमी झालेल्या गुळवी यांना येथील अलराजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री अकराच्या सुमारास गुळवी हे आपल्या घराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. यावेळी लाल रंगाच्या पल्सर बाईकवरुन आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला व पळून गेले. या गोळीबारामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरुन रिव्हॉल्व्हर तसेच तीन जिवंत काडतुसे जप्त केली असून प्रवीण गुळवी, विनोद गुळवी, सोनवाथ तारे आणि शंकर गुळवी या संशयीतांना अटक केली आहे. रविवारी या संशयीतांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2013 रोजी प्रकाशित
भिवंडीत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, चौघांना अटक
भिवंडी येथील निंबवली गावात राहणाऱ्या आत्माराम सखाराम गुळवी (५६) या बांधकाम व्यावसायिकावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली असून गोळीबारत जखमी झालेल्या गुळवी यांना येथील अलराजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
First published on: 06-05-2013 at 03:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Builder shot at by unidentified men in thane town of bhiwandi