मुंबईच्या माहिम परिसरात काल (सोमवार) रात्री ‘अल्ताफ’ या इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, तर ६ जण जखमी असल्याचे समजते. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची भिती आहे. माहिमच्या छोटा दर्गा परिसरात ही चार मजली इमारत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून मदतकार्य सुरू आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इमारत जवळपास पन्नास वर्षे जूनी आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली असल्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
माहिमच्या छोटा दर्गा भागातील इमारत कोसळली
मुंबईच्या माहिम परिसरात काल (सोमवार) रात्री 'अल्ताफ' या इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, तर ६ जण जखमी असल्याचे समजते.
First published on: 11-06-2013 at 07:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Building collapes in mahim chota darga area