केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ यांची पजेरो गाडी शुक्रवारी रात्री मुंबईतील एन.एम.जोशी मार्गावरून चोरीला गेली. टी एम ०९ ई ९०५ असा त्या गाडीचा नंबर असून श्रॉफ यांचे चालक विजय खरात हे याच परीसरात राहत असल्याने शुक्रवारी त्यांनी गाडी एन. एम. जोशी रोड वर पार्क केली होती. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी घेऊन जाण्यासाठी खरात त्या ठिकाणी पोहचले असता त्यांना गाडी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी एन. एम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गाडी चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली असून पोलिसांनी गाडीचा शोध सुरू केला आहे.