उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करून वीस फुटांपेक्षा जास्त उंच दहिहंडी लावल्याप्रकरणी दादरच्या साईदत्त उत्सव मंडळावर शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दहिहंडी उत्सवाच्या आयोजकांवर दाखल झालेला हा शहरातील पहिला गुन्हा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च न्यायालयाने दहिहंडी उत्सवासाठी अनेक र्निबध लागू केले होते. त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी शहरातील उत्सवांवर लक्ष ठेवले होते. दादरच्या साईदत्त उत्सव मंडळाने छबिलदास रोड येथे वीस फुटांपेक्षा जास्त उचींचे थर लावून दहिहंडी फोडली होती. त्यामुळे मंडळाचे आयोजक कृष्णा सावंत यांच्यावर शिवाजी पार्क पोलिसांनी न्यायालयाचा अवनान तसेच दुसऱ्याच्या जिवितास धोका उत्पन्न करणे (कलम ३३६ आणि १८८) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शहरातील ८०० प्रमुख दहिहंडी उत्सवाचे पोलिसांनी व्हिडियो चित्रण केले असून त्याच्या तपासणीनंतर ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case register against handi organizers
First published on: 10-09-2015 at 05:54 IST