पंतप्रधान जीवनज्योती योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना आणि अटल पेन्शन योजना या केंद्र सरकारच्या तीन महत्त्वाकांक्षी योजनांचा प्रारंभ राज्यात ९ मे रोजी १२ ठिकाणी होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करून १२ ठिकाणी या योजना सुरू केल्या जाणार आहेत. जिल्ह्य़ातील नामांकित बँकांच्या सहकार्याने त्या प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. या योजनांसाठी ३१ मे पर्यंत सर्वाचे अर्ज भरून घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.