मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची शुक्रवारी उच्च न्यायालयात जाऊन भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुपारी १२च्या सुमारास उच्च न्यायालयात जाऊन मुख्य न्यायमूर्तींची भेट घेतली. एक तास या दोघांमध्ये चर्चा झाली. या वेळी अन्य न्यायमूर्ती उपस्थित नव्हते. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे कळू शकले नाही. मात्र मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींमधील ही सदिच्छा भेट होती. मुख्यमंत्री दोन-तीन महिन्यांतून एकदा मुख्य न्यायमूर्तींची भेट घेतात असे उच्च न्यायालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister thackeray visits chief justice akp
First published on: 15-05-2021 at 01:02 IST