शास्त्रीय संगीतातील आघाडीचे गायक मुकूल शिवपुत्र यांच्या ‘गंधर्वगान’ या कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारी (१३ जानेवारी) कल्याण येथील अत्रे रंगमंदिरात रात्री ८.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून जमा होणारा निधी गरीब लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४० च्या ‘सव्‍‌र्हिस १२’अंतर्गत गरजू लहान मुलांच्या शस्त्रक्रियेचा उपक्रम नियमितपणे राबविला जातो. अधिक माहितीसाठी ९८२२०५५३१७ अथवा ९८२०१२२४६४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.