भारतात सीएएचा कायदा लागू झाल्यानंतर वर्षाच्या सुरूवातीला दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात हिंसाचाराची घटना घटली. त्यानंतर मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वर आंदोलन करत ‘स्वतंत्र काश्मीर’ची (Free Kashmir) मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले. यावरून अनेक वादांना तोंड फुटलं होतं. या वादात काश्मीरबद्दलचा तो फलक हातात घेऊन उभी असणाऱ्या तरूणीविरोधातील तक्रार मागे घेण्यात आली आहे. महेक मिर्झा प्रभू असं या तरूणीचं नाव असून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होता, पण मंगळवारी मुंबई पोलिसांनी ही तक्रार मागे घेतली. याच मुद्द्यावरून भाजपाचे अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली.
“वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर जेएनयुतील तुकडे गँगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात ‘काश्मीर मुक्त करा’चे फलक होते, त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा”, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया वर जेएनयुतील तुकडे गॅंगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात “काश्मीर मुक्त करा” चे फलक होते त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा. pic.twitter.com/o3LlPB7Wi5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 29, 2020
आणखी वाचा- ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट?; आशिष शेलारांचा सवाल
जानेवारी २०२०मध्ये हा प्रकार घडला असताना यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “हे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू आहे? काश्मीर मुक्तीची घोषणा आंदोलनात कशी? मुंबईत असे फुटीरतावादी खपवून का घ्यायचे? मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किमी अंतरावर काश्मीर मुक्त भारताची घोषणाबाजी होते, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खपवून घेणार का?”, असे सवाल फडणवीस यांनी ट्विटरवरून राज्य सरकारला केले होते.