scorecardresearch

सुंदर पिचाई यांच्याविरोधात तक्रार

‘अंदाज’, ‘जानवर’ असे काही मोजके वेगळे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक सुनील दर्शन यांचा ‘एक हसीना थी एक दिवाना था’ हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता.

Mumbai Police books Google CEO Sundar Pichai for Copyright Act violation

मुंबई : ‘गुगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्यासह अन्य सहा अधिकाऱ्यांविरोधात स्वामित्व हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिंदी चित्रपटं निर्माते, दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी तक्रार नोंदवली आहे. पिचाई यांच्याविरोधातील या तक्रारीमुळे गुगल आणि युट्यूबवर सर्रास स्वामित्व हक्कांचे उल्लंघन करून आशय दाखवला जातो, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न दर्शन यांनी केला आहे.

‘अंदाज’, ‘जानवर’ असे काही मोजके वेगळे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक सुनील दर्शन यांचा ‘एक हसीना थी एक दिवाना था’ हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे स्वामित्व हक्क आपण कोणालाही विकलेले नाहीत. तरी हा चित्रपट बेकायदा युट्यूबवर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी तक्रार दर्शन यांनी केली आहे. या चित्रपटाला युट्यूबवर अब्जावधी प्रेक्षकसंख्या लाभली आहे, मात्र चित्रपटाची निर्मिती आपली आहे, स्वामित्व हक्क आपल्याकडे आहेत तरीही आपल्याला कुठल्याही प्रकारे आर्थिक मोबदला देण्यात आलेला नाही, असे दर्शन यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दर्शन यांनी याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दर्शन यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे यासंबंधी खासगी तक्रार केली. दर्शन यांच्या तक्रारीत तथ्य आहे.

सध्या पायरसी आणि स्वामित्व हक्क डावलून बेकायदा चित्रपट वा तत्सम आशय दाखवण्याचा प्रकार सगळीकडे बोकाळला आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी तपास करायलाच हवा, असे स्पष्ट करत दंडाधिकारी न्यायालयाने अंधेरी एमआयडीसी पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Complaint against google ceo sundar pichai akp

ताज्या बातम्या