फेसबुक, ट्विटर, युटय़ूब यांसारख्या समाजमाध्यमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार असल्याची ग्वाही मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली. याचबरोबर विद्यार्थ्यांना डिजिटल लॉकर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी विद्यापीठात खेटे माराव्या लागतात. कधी मार्कशिटसाठी तर कधी पदवी प्रमाणपत्रासह इतर अनेक गोष्टींसाठी. मात्र येत्या काळात आपण या विद्यार्थ्यांना डिजिटल लॉकरची सुविधा उपलब्ध करून देणार असून या माध्यामतून विद्यार्थ्यांना त्यांची महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर सुविधा एका क्लिकच्या साहाय्याने विद्यार्थ्यांमध्ये पोहचविण्याचा आपला मानस देशमुख यांनी सोमवारी व्यक्त केला. मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मंगळवारी कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी प्रथमच पत्रकारांशी बोलत होते.
मुंबई विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवायचा असल्यास अनेक सुधारणा करणे गरजेचे असून त्यानुसार आपण नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर परीक्षा विभागातील गोंधळाबाबत होणारी टीका लक्षात घेता, हे थांबविण्यासाठी वर्षांच्या सुरुवातीलाच जर अॅकडमिक दैनंदिनी जाहीर केली तर त्याचा फायदा नक्कीच होईल तर विद्यापीठात कोणताही गरप्रकार उघडकीस आल्यास तर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत कुलगुरूंनी पत्रकारांशी बोलताना दिले. याचबरोबर विद्यापीठातील अनेक संघटनांच्या वादाचा फटका विद्यापीठीच्या कामकाजावर बसत असतो. हे टाळण्यासाठी आगामी काळात या संघटनांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये यासाठी समन्वय साधण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असे डॉ. देशमुख यांनी सांगितले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constantly in touch with students says dr sanjay deshmukh
First published on: 08-07-2015 at 12:16 IST