मुंबई विद्यापीठातील शेकडो ग्रथांची दयनीय अवस्था; डिजिटलीकरणही संथगतीने

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या नव्या इमारतीला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे जुन्या इमारतीत लाखो पुस्तके अखेरचा श्वास घेत आहेत. ग्रंथालयाची अवस्था बिकट असून दुर्मीळ पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्र आदींना वाळवी लागली आहे. दोन वर्षांहून अधिक काळ ही पुस्तके धूळ खात पडली असून विद्यापीठाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

 ग्रंथालयाची झालेली दुरवस्था अधिसभा सदस्यांनी २०१९ मध्ये कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विद्यापीठाने नूतनीकरणाचे काम हाती घेतले. परंतु संथ कारभारामुळे तीन वर्षे उलटूनही दुरुस्ती झालेली नाही. दुरुस्तीआधी ग्रंथालयातील पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याऐवजी त्याच ठिकाणी दुसऱ्या भागात ठेवण्यात आली. काही पुस्तके पोत्यामध्ये, काही सिमेंट वाळूच्या ढिगाऱ्यालगत, तर खणात ठेवलेल्या काही पुस्तकांवर धुळ साचली आहे.या पुस्तकांना नवे आयुष्य मिळावे यासाठी अधिसभा सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी कुलगुरूंना पत्र दिले आहे.  यापैकी अनेक पुस्तकांना वाळवी लागल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

 एकीकडे मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करणाऱ्या विद्यापीठातील त्याच भाषेतून घडलेली ग्रंथसंपदा मरणासन्न अवस्थेत पडली आहे याचे भान आहे का, असा सवाल अधिसभा सदस्य अ‍ॅड.  थोरात यांनी केला आहे. तसेच ग्रंथालयाची नवी इमारत तयार होऊन पाच वर्षे उलटली, तरी अद्याप ती वापरात का आलेली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. 

 स्कॅनरही वापराविना पडून

 दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायजेशन करण्यासाठी विद्यापीठाने ७५ ते ९० लाख रुपये खर्च करून स्वयंचलित स्कॅनर विकत घेतला होता. मात्र हा स्कॅनर चालवण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ विद्यापीठाकडे नाही. त्यामुळे पाच वर्षांपासून हा स्कॅनर विनावापर पडून आहे. 

या ग्रंथालयातील अनेक पुस्तके ही जीर्ण आणि कालबाह्य झाली असून ती वेगळी करून रद्दबाबल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच उपयोगात नसलेली पुस्तके रद्दीत देण्यासाठी गोणीत भरुन ठेवण्यात आली आहेत. अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे डीजीटायझेशन करण्याच्या उद्देशाने रोबोटिक स्कॅनरद्वारे स्कॅनिंगची प्रक्रिया लवकरच हाती घेण्यात येणार आहे. ग्रंथालय इमारतीच्या दुरुस्तीच्या कामात टाळेबंदीत थोडा खंड पडला होता, मात्र आता ते काम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. तसेच ग्रंथालयाच्या नव्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून मार्च अखेरीस ही इमारत वापरासाठी खुली होईल, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र, तोपर्यंत या ऐतिहासिक ग्रंथसंपदेचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

विभागांचेही दुर्लक्ष

या ग्रंथालयाची पडझड २०१८ पासून सुरू आहे. याच पडझडीमुळे अडीच लाख दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह असलेल्या ग्रंथालयातील भाषा विभागाला टाळे लागले होते. ग्रंथशास्त्र विभागालाही या पडझडीचा मोठा फटका बसला आहे. पुस्तकांसाठी विद्यापीठाने पर्यायी जागा दिली नसल्याने पुस्तके हलवता आली नाहीत. तर आपापल्या विषयाची निगडित पुस्तके विभागांमध्ये घेऊन जाण्याचा पर्याय प्राध्यापकांना देण्यात आला होता. परंतु पुस्तके सांभाळताना हेळसांड झाल्यास विद्यापीठाला उत्तर द्यावे लागेल या भीतीने प्राध्यापकांनीही पुढाकार घेतला नाही. परिणामी पुस्तके वाळवीचे खाद्य बनली आहेत, अशी खंत ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.  

एकूण ग्रंथसंपदा

 विद्यापीठात कलिना आणि फोर्ट या दोन्ही संकुलांत मिळून एकूण ७ लाख ९२ हजार १८ इतकी ग्रंथसंख्या आहे. याव्यतिरिक्त ११,६६८ संदर्भग्रंथ, विविध विषयांवरील ७८ हजार जर्नल्स, २१,६७२ प्रबंध, आणि ९,९०० दुर्मीळ ग्रंथ अशी एकूण ९ लाखांहून अधिक साहित्यसंख्या आहे. त्यापैकी ४ लाख पुस्तके कालिना येथील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात आहेत, तर उर्वरित पुस्तके फोर्ट येथील रिसर्च सेंटर या मुख्य ग्रंथालयात आहेत.