करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने लॉकडाउन व  संचारबंदी जाहीर करुन नागिरकांना घरातच राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस प्रशानसन दिवसरात्र कर्तव्य बजावत आहे. मात्र तरी खील काही नागरिका याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अशा नागरिकांविरोधात पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. याच पार्श्वभूमीवर मॉर्निंग वॉकला निघालेल्या 35 जणांविरोधात कळंबोली पोलिसांनी कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घराबाहेर न पडण्याचे आदेश दिलेले असताना  कळंबोली वसाहतीमधील  स्त्यांवरुन मॉर्निंग वॉकला निघालेल्या   तब्बल 35 जणांना कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.

पनवेलमधील कोरोना बाधितांची संख्या 21 वर पोहचली आहे. एका 33 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तरीही नागरिक घराबाहेर जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यानंतर शनिवारी पहाटे साडेसहा वाजेपासून पोलीस उपनिरीक्षक मनेश  बच्छाव  यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके स्थापन करुन पहाटे रस्त्यावर फिरणाऱयांची धरपकड करण्यात आली.

विशेष म्हणजे पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या नागरिकांपैकी अनेकजण उच्चशिक्षित आहेत. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतल्यावर त्यांना कळंबोली पोलीस ठाण्यातील आवारात आणून दोन तास योगाचे धडे  स्वतः उपनिरीक्षक बच्छाव यांनी दिले. त्यानंतर संबंधित  नागरिकांवर भारतीय दंड संहिता 188 प्रमाणे रीतसर कारवाई केल्यानंतर त्यांना समज देवून घरी पाठवण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus action on 35 people leaving for morning walk msr
First published on: 11-04-2020 at 13:39 IST