१३०० इमारतींवर प्रतिबंध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबईत सध्या प्रतिबंधित असलेल्या दहा हजारांहून अधिक इमारतींपैकी सुमारे पाच हजार इमारती पश्चिम उपनगरांतील असून त्यातही सर्वाधिक १३०० इमारती केवळ बोरिवलीतील आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रतिबंधित इमारतींबाबत नवीन धोरण आणले. त्यानुसार एखाद्या इमारतीत दहापेक्षा अधिक रुग्ण असल्यास किंवा दोन अथवा अधिक मजल्यांवर रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले. मात्र संपूर्ण मुंबईत सध्या जेवढय़ा इमारती प्रतिबंधित आहेत, त्यापैकी ५० टक्के इमारती या केवळ पश्चिम उपनगरांतच आहेत. बोरिवलीत आतापर्यंत जेवढे रुग्ण आढळले, त्यापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे इमारतीतील आहेत. तसेच यापैकी बरेचसे रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे त्यांना गृह अलगीकरणाची परवानगी आहे. अशी दोन-तीन कुटुंबे जरी एका इमारतीत असली तरी ती इमारत प्रतिबंधित करतो, असेही पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

१०,१०६ मुंबईत सध्या प्रतिबंधित इमारती

११.७ लाख प्रतिबंधित इमारतीतील लोकसंख्या

६४९  प्रतिबंधित झोपडपट्टय़ा

३१.८ लाख  प्रतिबंधित झोपडपट्टय़ांमधील लोकसंख्या

प्रतिबंधित इमारती

१३१६ बोरिवली

८०४  अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम

७८६ कांदिवली

७६२ शीव, वडाळा

७०४ मालाड

६७२ मुलुंड

६०८ घाटकोपर

५०८ अंधेरी, जोगेश्वरी पूर्व

४५०  दहिसर

४२३ गोरेगाव

रुग्ण वाढत आहेत असे लक्षात आले की संपूर्ण इमारतीतील लोकांच्या चाचण्या करतो. कारण एकच जिना, लिफ्टचा वापर होत असतो. तसेच कधी कधी एकच नोकर किंवा मदतनीस अनेक घरांत काम करत असतात. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका असतो. म्हणून इमारत प्रतिबंधित करण्याची खबरदारी घ्यावी लागते.

– भाग्यश्री कापसे, साहाय्यक आयुक्त, ‘आर-मध्य’

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus in mumba most restricted areas in borivali zws
First published on: 08-10-2020 at 01:42 IST