कल्याण (पूर्व)येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक नितीन निकम यांना मंगळवारी कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सात हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. गणेशवाडी भागात पाणीटंचाईच्या प्रश्नावरून निकम यांनी ठेकेदाराच्या वृद्ध मुकादमाला बेदम मारहाण केली
होती.
या भागात पाण्याची फुटलेली जलवाहिनी सदर ठेकेदार व्यवस्थित दुरुस्त करीत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी निकम यांना सांगितले होते. त्यामुळे निकम यांनी ठेकेदार, पालिका अधिकारी यांना जलवाहिनीच्या ठिकाणी बोलविले होते. या ठिकाणी ठेकेदाराचे मुकादम दिगंबर पाटील उपस्थित होते. निकम यांच्या प्रश्नांना ते त्वरित उत्तर देऊ न शकल्याने निकम यांनी वयस्कर पाटील यांना मारहाण केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2012 रोजी प्रकाशित
नगरसेवक नितीन निकम यांना अटक आणि सुटका
कल्याण (पूर्व)येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक नितीन निकम यांना मंगळवारी कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सात हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले. गणेशवाडी भागात पाणीटंचाईच्या प्रश्नावरून निकम यांनी ठेकेदाराच्या वृद्ध मुकादमाला बेदम मारहाण केली होती.
First published on: 05-12-2012 at 06:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporator nitin nikam arrested and discharged