scorecardresearch

मुंबईमधील जोडपं Live Stream करत होतं Sex Video; गायकाच्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरु

करोना लॉकडाउननंतर अशाप्रकारचे व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीम करण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे प्रकरण सुद्धा यापैकीच एक आहे.

Porn Live Video Mumbai Police Case
या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरु केलाय. (प्रातिनिधिक फोटो)

मुंबईमधील मीरा रोड येथील एका जोडप्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या जोडप्याने सेक्स करतानाचे लाइव्ह स्ट्रीमींग केल्याचा आरोप केला जात आहे. लोकांकडून पैसे घेऊन या जोडप्याने आपले खासगी क्षण लाइव्ह स्ट्रीम केल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये एका गायकाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्याची माहिती समोर आलीय.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या गायकाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये आपल्याला एका वेबसाईटवर पॉर्नसंदर्भातील जाहिरात दिसल्याचं म्हटलं आहे. ही जाहिरात पाहून यामध्ये काहीतरी मोठी गडबड आहे अशी शंका आली. मात्र या जाहिरातीमधील एका व्यक्तीला आपण ओळखतो असं वाटल्याने या तक्रारदाराने पैसे भरुन नक्की काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पैसे भरल्यानंतर त्याला एका पेजची लिंक देण्यात आली जिथे अनेकजण लाइव्ह सेक्स करतानाचे स्ट्रीमींग केलं जात होतं. या पेजवरील एका व्हिडीओमध्ये या गायकाच्या ओळखीचं एक जोडपंही सेक्स करतानाचा लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीम करत असल्याचं दिसलं. वयाच्या तिशीमधील हे जोडपं त्यांच्या व्ह्यूअर्सकडून सल्लेही मागवतं होतं, असंही तक्रारीत म्हटलं आहे.

या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. करोना लॉकडाउननंतर अशाप्रकारचे व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीम करण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता या जोडप्याने स्वइच्छेने हे लाइव्ह स्ट्रीम केलेलं की इतर काही प्रकार आहे याचा तपास केला जात आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-11-2021 at 09:08 IST