गुंड सुरेश पुजारीविरोधात गुन्हा

५१ वर्षीय तक्रारदार ओशिवरा येथील जॉगर्स पार्क परिसरातील लोखंडवाला बॅक रोड येथील रहिवासी आहे.

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

मुंबई: फिलिपिन्समध्ये  अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड सुरेश पुजारीविरोधात मुंबईत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुजारीने ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार सांताक्रुझ येथील हॉटेल व्यवसायिकाने मुंबई पोलिसांकडे केली होती.  पुढील तपासासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ सूत्रांनी दिली.

५१ वर्षीय तक्रारदार ओशिवरा येथील जॉगर्स पार्क परिसरातील लोखंडवाला बॅक रोड येथील रहिवासी आहे.  सांताक्रुझ पश्चिम येथे त्यांचा रेस्टॉरन्ट व बार आहे. मार्च महिन्यात पुजारीने तक्रारदार व्यावसायिकाकडे धमकावून ५० लाख रुपयांची मागणी केली होती. अन्यथा मारून टाकण्याची धमकी दिली होती.

 जीवाच्या भीतीने व्यावसायिकाने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र १५ ऑक्टोबरला सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये स्थानिक गु्प्तहेर विभागाने अटक केल्याची बातमी प्रसिद्धी माध्यमांवर पाहिल्यानंतर पुजारीने आपल्यालाही ५० लाखांची खंडणीसाठी धमकावल्याची तक्रार केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crime against goon suresh pujari akp

ताज्या बातम्या