मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’साठी आरे वसाहतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडच्या विरोधात ‘आरे संर्वधन गटा’कडून दर रविवारी ‘आरे वाचवा’ आंदोलन करण्यात येत आहे. येत्या रविवारी आरे वसाहतीमध्ये आंदोलनाबरोबरच एक सायकल रॅलीही काढण्यात येणार आहे.

हेही वाचा : बेस्ट बसला दुचाकी सेवेची जोड; वर्षभरात विजेवर धावणाऱ्या एक हजार दुचाकी सेवेत येणार

हेही वाचा : स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

राज्य सरकारने ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो३’साठी आरो वसाहतीत कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्यामुळे आरे संवर्धन गट सक्रिय झाला आहे. या गटातील कार्यकर्त्यांनी कारशेडविरोधात आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर न्यायालयातही धाव घेतली आहे. आरे वसाहतीमधील पिकनिक पॉईंट येथे दर रविवारी आंदोलन करण्यात येत असून जोपर्यंत आरे कारशेड इतरत्र हलविली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा आरे संवर्धन गटाने दिला आहे. त्यामुळेच रविवारी नवव्या आठवड्यातही आरे वसाहतीत आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाबरोबरच सायकल रॅलीही काढण्यात येणार आहे.

ही सायकल रॅली कुठून निघेल आणि कुठे संपेल हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईचे फुफ्फुस अशी ओळख असलेले आरे वसाहतीमधील जंगल वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या सायकल रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमी तन्मय शिंदे यांनी केले.