मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्या कटातील सुत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड हेडलीची सलग तिसऱया दिवशी होणारी साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गुरूवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. नियोजित वेळेनुसार आज सकाळी सात वाजता हेडलीची साक्ष नोंदविण्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अमेरिकेतील तुरूंगात संपर्क साधता येऊ शकला नाही. अखेर हेडलीची साक्ष उद्यापर्यंत तहकूब करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना शिक्षा घडवण्यास सहकार्य करू
दरम्यान, गेल्या दोन दिवसांच्या जबाबात डेव्हिड हेडलीने मुंबई हल्ल्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे केले. मुंबईवरील हल्ल्यासाठी सीएसटी स्थानक कधीच लक्ष्य नव्हते तर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरावर हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तोयबा आणि ‘आयएसआय’ यांनी रचला होता. त्या मंदिराची मी विशेष पाहणी व चित्रीकरण केले होते, असा गौप्यस्फोट हेडलीने मंगळवारी केला. एवढेच नव्हे, तर २६/११च्या हल्ल्याच्या एक वर्ष आधी हॉटेल ताजमहलमध्ये होणाऱ्या भारतीय सुरक्षा वैज्ञानिकांच्या बैठकीवरही हल्ल्याचा कट होता. त्याचा सरावही झाला होता. मात्र बैठकच रद्द झाल्याने तो बारगळला, असा खुलासाही त्याने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David headley deposition delayed due to glitch in video feed
First published on: 10-02-2016 at 09:25 IST