मुंबई विद्यापीठाच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांबाबत १४ एप्रिलनंतर शासनाचे आदेश आणि तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा २३ मार्चपासून सुरू होणार होत्या. कोरोना विषाणूचा प्रादुड्टराव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विड्टाागाने ३१ मार्चपर्यंत होणाऱ्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ३१ मार्चला परीक्षांबाबत पुढील निर्णय जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवी स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षांच्या सर्व लेखी व  प्रात्यक्षिक परीक्षा  १४ एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शासनाचे आदेश आणि परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे परीक्षा विभागाचे संचालक विनोद पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा जरी पुढे गेल्या असतील तरी हे दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या कालावधीत  त्यांनी घरी बसून अड्टयास करावा, कुटुंबियांसोबत वेळ व्यतीत करावा. अभ्यासासाठी ऑनलाईन प्रणालीचा पर्याय आहे. अभ्यासाच्या काही समस्या असतील तर आपल्या शिक्षकांशी संपर्क साधून त्या सोडवाव्यात. आपले छंदही जोपासा मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग करा.

— डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ