बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे, ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकावर अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज (शुक्रवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल आदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याप्रसंगी उपस्थित होते. कोविड १९ विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे, हा कार्यक्रम पूर्णतः दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला.

water Mumbai, water distribution,
‘चावीवाले’ निवडणूक कामात, पाणी कोण सोडणार?
Displeasure of office bearers in BJPs election planning meeting
अलिबाग : भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीतही पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर…
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!
navi mumbai, cctv camera, navi mumbai cctv camera
निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच

या प्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले, “आजचा मकरसंक्रांतीचा मुहूर्त चागंला आहे, सर्वांना शुभेच्छा तर देतोच आहे आणि मी नेहमी अशी अपेक्षा करतो की, गोड बोलण्यासाठी तीळ-गुळाची अपेक्षा न करता गोड बोललं तर अधिक चांगलं होतं. आजचा हा कार्यक्रम आहे नेहमी अशा कार्यक्रमच्या वेळेला एक बोललं जातं, तशी एक प्रथा आहे, की जाच दिन हा सुवर्ण दिन आहे, आचा दिन सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल, आजहा हा क्रांतीकारक क्षण आहे. कोणतं विशेषण लावायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. पण एक सर्वसाधरणपणे शासकीय किंवा प्रशासकीय कामाबद्दल समज किंवा गैरसमज असा झालेला दिसून येतो की, कोणतही काम तिळगुळ दिल्याशिवाय होत नाही. आणि आजचा हा कार्यक्रम आहे तो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, म्हणून मी म्हटलं की मुहूर्त चांगला आहे कारण इकडे तिळगुळ न देता सुद्धा काम तर होणारच आहे. पण एक अनुभव नेहमी सरकारी कार्यालयात येत असतो, तिकडे गोड बोलणं तर सोडाच, बोलणं देखील खूप अवघड मानलं जातं. लोकाची साधी कामं असतात, परंतु ती करणं तर बाजुलाच राहीलं, पण साधं उत्तर देखील मिळत नाही. अशावेळी नागरिकांमध्ये एक वैफल्य येतं. मत मागताना जी लोक झुकलेली असतात, ती मत मिळाल्यानंतर मात्र ताठ होतात. ओळखही विसरतात आणि अशा वेळी हा जो कार्यक्रम आपण आजपासून सुरू करत आहोत, तो मी म्हणेन की खरच एक क्रांतीकारक कार्यक्रम आहे.”

तसेच, “मला अभिमान आहे ही आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील क्रमांक एकची महापालिका आहे. क्रमांक एकचं शहर आहे. या पद्धतीने जनतेची साधी-साधी कामं होत आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग जर सर्वसामान्यांना होत नसेल, तर मग त्याचा काहीही उपयोग नाही, असं मी मानतो. म्हणून मला अभिमान वाटतोय की, माझी महापालिका या तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सहजता आणण्यासाठी करते, हे एक खूप मोठं काम आहे.” असंही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखलं.

याचबरोबर, “५०० चौरसफुटापर्यंत मालमत्ता कर रद्द करून आपण या वर्षाची सुरूवातच दणक्यात केली. त्यानंतर कालपरवा कोस्टलरोडचं जे काम सुरू आहे मावळा त्याचं थेट प्रेक्षपण. अनेकदा असं होतं की कामं न करता बोलणारी देखील अनेक लोक आहेत. तर, काही लोक काम करतात पण बोलतच नाहीत. मग त्याला आपण असं म्हणतो की जंगल मै मोर नाचा किसने देखा. तर आपण सगळ्यांना दाखवतोय की आम्ही काय करतोय आणि आमचा कारभार हा अत्यंत उघडा आहे. यामध्ये लपवाछपवीसारखं काहीच नाही. जे काय आहे ते तुमच्या सेवेसाठी आम्ही करत आहोत.” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मनोगतातील मुद्दे

• महापालिकेच्या सुविधांचा आज मुंबईकरांना घरी बसून लाभ मिळेल, याचा विशेष आनंद
• आय.टी क्षेत्रात भारताचे लोक जगात अग्रेसर
• दुबई पेपरलेस झाले. त्याच धर्तीवर मुंबई महापालिका दुबई प्रमाणे पेपरलेस व्हावी
• उत्तम जागतिक सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याच्या आदित्य ठाकरे यांच्या परिवर्तनशील पाऊलांचे खुप कौतूक वाटते.
• साध्या साध्या गोष्टीसाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन चकरा मारणे या उपक्रमामुळे थांबले
• यामुळे टेंडरप्रक्रियाही अधिक पारदर्शी झाली.
• मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई शहर अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने बदलत आहे.
• कोविड काळात मुंबई पालिकेने केलले काम खुप कौतूकास्पद ज्याचे जागतिक आरोग्य संघटना असेल किंवा वर्ल्ड बँक यांनीही दखल घेतली

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भाषणातील मुद्दे

• मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा
• कोरोनाकाळात मनुष्य संपर्क विरहीत काम करतांना जन्मापासून मृत्यूपर्यंतची एकूण एक प्रमाणत्रे या व्हॉटसॲप सुविधेद्वारे उपलब्ध होतील. मुंबईकरांना ही सुविधा उपलब्ध करून देतांना खुप आनंद आणि समाधान वाटते.
• मुंबईकरांना नागरी सेवा सुविधा तत्परपणे उपलब्ध करून देण्यात महापालिका नेहमीच अग्रेसर
• संक्रमणात नवीन काही तरी शोधणे अपेक्षित त्यामुळे आजचा दिवस अतिशय औचित्यपूर्ण
• महापालिकेच्या आय.टी कक्ष, अधिकारी कर्मचारी कौतूकास पात्र
• मुख्यमंत्री नेहमीच मुंबईकरांना नवनवीन सुविधा देण्यासाठी आग्रही असतात.
• त्यातूनच कोस्टलरोडचे काम असो की आयटी सुविधा देण्याचे काम असो त्या सर्व गोष्टी सुरु राहिल्या.
• ही सेवा २४ तास उपलब्ध
• व्हॉटसअप चॅट बोटचा क्रमांक ही सोपा.

डॉ. इक्बालसिंह चहल यांच्या मनोगतातील मुद्दे

• आज अतिशय चांगला उपक्रम सुरु होत आहे. मागील काही महिन्यांसाठी यासाठी खुप मेहनत घेण्यात होती. आज या सुविधेमुळे ८० पेक्षा अधिक सेवा सुविधा नागरिकांना हातातील मोबाईलवर मिळतील, काही सेकंदात नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण होईल. देशातला असा हा पहिलाच उपक्रम.
• कोविड युद्ध लढतांना आय.टीच्या सुविधा खुप महत्वाच्या
• नागरिकांना घरी बसून गणपती परवाना, लायसन फी, वॉर्ड नंबरची माहिती मिळणे, वॉर्ड ऑफीसरचे नाव व इतर प्रश्न त्यांना या व्हॉटसअप चॅटद्वारे सुटण्यास मदत होईल
• मागील दोन वर्षापासून कोविडशी लढतांना व्हॉटसअपची भूमिका महत्वाची. समुपदेशकांचा ग्रुप, वॉर्ड ऑफीसरचा ग्रुप, कोविड योद्ध्यांचा ग्रुप असे अनेक ग्रुप करून आपण कोविडशी नेटाने लढा दिला.
• नागरिकांना ८० सेवा सुविधांचा लाभ घरी बसून मिळणे ही निश्चित कौतूकास्पद. देशात असा उपक्रम सुरु करणारी बहृन्मुंबई महानगरपालिका पहिली महापलिका
• ही माहिती देतांना महापालिकेच्या व व्हॉटसअप टीमच्या लोकांनी अचूक व परिपूर्ण माहिती मिळेल याची काळजी घ्यावी