मुंबई : शहर भागातील अनेक रस्त्यांची कामे सुरू करण्यास कंत्राटदाराने विलंब केला आहे. मुंबई महानगरपालिकेने त्याची गंभीर दाखल घेत त्याचे कंत्राट रद्द केले आहे. मात्र, या कंत्राटदाराने खोदून ठेवलेल्या या १५ रस्त्यांची दुरुस्ती कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना जाच सहन करावा लागत आहे. 

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी ‘रोड वे सोल्युशन इंडिया इन्फ्रा कंपनी’ची नेमणूक करण्यात आली होती. या कंपनीला कामाचे कार्यादेशही देण्यात आले. मात्र तरीही  कंपनीने रस्त्यांची कामे सुरू केली नाहीत. त्यामुळे अखेर महानगरपालिकेने या कंपनीचे कंत्राट रद्द केले. आता अल्पमुदतीची निविदा मागवून या रस्त्यांच्या कामांसाठी नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.  मुंबई शहर भागातील काँक्रीटीकरण करण्यात येणाऱ्या रस्त्यांपैकी २६ रस्त्यांच्या कामांना वाहतूक पोलिसांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र असे असतानाही कंत्राटदाराने मे महिना संपेपर्यंत या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवातच केली नाही. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. त्यामुळे कामे करता आली नाहीत.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

हेही वाचा >>>मंत्रालयासमोर गगनचुंबी इमारत बांधण्याचा प्रस्ताव; ‘मेट्रो’चा आर्थिक भार कमी करण्यासाठी योजना

शहरातील महानगरपालिकेच्या ‘ए’, ‘बी’ आणि ‘एफ उत्तर’ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील १५ रस्त्यांच्या कामांना ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच ना हरकत प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर कंत्राटदाराने १० ऑक्टोबर रोजी या १५ रस्त्यांच्या कामांसाठी खोदकाम केले.  आता महानगरपालिका प्रशासनाने या कंत्राटदाराचे कंत्राटच रद्द केले आहे. त्यामुळे खोदून ठेवलेल्या १५ रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून ही कामे कोण पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रस्ते खोदून ठेवल्यामुळे या परिसरातील रहिवाशांना त्रास सोसावा लागणार आहे. तसेच वाहतुकीचा प्रश्नही निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत़

६०८० कोटी रुपयांचा खर्च..

मुंबई खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने यंदा ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच पाच विभागांमध्ये ही कामे विभागण्यात आली असून त्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. महानगरपालिकेने शहरातील २१२ रस्ते आणि ८५ तुलटेल्या सिमेंट काँक्रीटी रस्त्यांच्या भागांच्या दुरुस्तीसाठी एका कंत्राटदाराची, पश्चिम उपनगरांतील ५१६ रस्त्यांच्या कामासाठी तीन कंत्राटदारांची, तर पूर्व उपनगरांतील १८२ रस्त्यांच्या कामांसाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या एकूण ३९७ रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ६०८० कोटी रुपये आणि विविध करांसह सुमारे ८३१९ कोटी रुपये खर्चाच्या कंत्राटाला मंजुरी देण्यात आली आहे.