देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमधील न्यायालयाने होणाऱ्या पत्नीला लग्नाआधी अश्लील मेसेज पाठवण्याच्या प्रकरणासंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिलाय. न्यायालयाने या प्रकरणामध्ये एका ३६ वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता केलीय. महिलेची फसवणूक करणे आणि बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भातील हा खटला होता. हा खटला मागील ११ वर्षांपासून सुरु होता. लग्नाच्या आधी लग्न ठरलेल्या मुलीला ‘अश्लील मेसेज’ पाठवल्याने समोरच्या व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, अपमान केला असं म्हणता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

मुंबईमधील सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात लग्न ठरलेल्या व्यक्तीला असे मेजेस पाठवल्याने आनंद मिळतो, असं उल्लेख करण्यात आलाय. तसेच अशा मेसेजेसमुळे समोरची व्यक्ती आपल्या भावना समजून घेण्याइतकी आपल्या जवळची आहे असंही वाटतं, असं निरिक्षक न्यायालयाने नमूद केल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

“जर समोरच्या व्यक्तीला हे आवडत नसेल तर त्यासंदर्भात विवेकपूर्ण पद्धतीने सांगावे. तसेच समोरची व्यक्ती सामान्यपणे अशापद्धतीची चूक पुन्हा करत नाही,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. असे मेसेज आवडले नाही तरी कोणत्याही पद्दतीने अमुक एका मेसेजमुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला, अपमान केला असं म्हणता येणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणामध्ये तक्रारदार महिलेने २०१० मध्ये एका व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केली होती. हे दोघेही २००७ साली एका लग्न जुळवणाऱ्या मॅट्रीमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून भेटले होते. मात्र या तरुणाच्या आईचा हा लग्नाला विरोध होता. त्यानंतर या तरुणाने तीन वर्ष प्रयत्न करुनही नातं पुढे जाणार नाही हे लक्षात आल्यानंतर आणि लग्नानंतर कसं आणि कुठे रहावं याबद्दल मतभेद असल्याने मुलीसोबतचे सर्व संबंध तोडले. न्यायालयाने या प्रकरणामध्ये निकाल देताना लग्नाचं आश्वासन देऊन नंतर नकार देण्याला विश्वासघात करणे किंवा बलात्कार करणे असं म्हणता येणार नाही, असा निकाल देत न्यायालयाने तरुणाची निर्दोष मुक्तता केली.

लग्नासंदर्भात हे दोघे आर्य समाज हॉलमध्ये विचारपूस करुन आले होते. मात्र नंतर एकत्र राहण्यावरुन वाद झाल्याने मुलाने आईचं म्हणणं ऐकत लग्न मोडण्याचा निर्णय घेतल्याचं न्यायालयाने निर्णय देताना अधोरेखित केलं. दोघांचीही संमती होती लग्नाला मात्र नंतर राहण्यावरुन वाद झाल्याने हे प्रकरण लग्नाचं आश्वासन देऊन ते मोडल्याचं ठरणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं. तसेच अश्लील मेसेजेससंदर्भातील मुद्दाही ग्राह्य धरला नाही. न्यायालयाने लग्न ठरलेल्या तरुणीला अश्लील मेसेज पाठवण्यामागील हेतू आपल्या इच्छा होणाऱ्या जोडीदारासोबत व्यक्त करण्याचा असू शकतो, असंही सांगितलं.