दहा तासांच्या मेगाब्लॉकनंतरही अशक्य; जलद गाडय़ांसाठीचा थांबाही पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा भाग

दहा-दहा तासांचे चार महा-मेगाब्लॉक, ब्लॉकदरम्यान कळवा-मुंब्रा येथे धीम्या गाडय़ांना थांबा नाही, दीड वर्षांपेक्षा जास्त चाललेले काम असा बराच मोठा आटापिटा करूनही ‘दिवा लोकल’चे तेथील स्थानिकांचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे नाहीत. या कामांनंतर दिवा स्थानकात जलद गाडय़ा थांबणे शक्य होणार असले, तरी दिव्याहून सुटणारी किंवा दिव्यापर्यंतच धावणारी लोकल गाडी सोडणे अशक्य आहे. परिणामी दिवा, कळवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांचे हाल कायम राहणार आहेत. विशेष म्हणजे दिवा येथील उग्र आंदोलनानंतर अचानक हा जलद गाडय़ांच्या थांब्याचा घाट घालण्यात आला नसून हा ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिका प्रकल्पाचाच भाग आहे.

Additional fare EFT is being allowed for passengers traveling in reserved coaches on ordinary tickets
आरक्षित डब्यांत रेल्वेच्या कृपेने ‘साधारण’ प्रवाशांचा सुळसुळाट
Pune Metro, ruby hall, ramwadi Extended Route, Surge in Ridership, Revenue, yerwada metro station, pune citizen in metro, maha metro, marathi news, metro news,
पुणे मेट्रो सुसाट! प्रवासी संख्ये सोबतच उत्पन्नातही मोठी वाढ
uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके

गेल्या वर्षी दिवा स्थानकात प्रवाशांनी उग्र आंदोलन केल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी जलद गाडय़ा थांबवण्यासाठीचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात एमयुटीपी-२ योजनेअंतर्गत ठाणे-दिवा यांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका बांधण्याच्या प्रकल्पात दिवा येथील जलद मार्गाच्या प्लॅटफॉर्मचे बांधकाम या कामाचा समावेश होता. त्यानंतर दिव्यात जलद गाडय़ा थांबतील.  दिवा लोकलची साातत्याने मागणी असली तरी ही लोकल अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  गाडय़ा थांबवून मागे वळवण्यासाठी  वेगळी कामे करावी लागतात. ती येथे करणे अशक्य आहे. त्यामुळे या महा-मेगाब्लॉकच्या कामांनंतरही दिवा येथून लोकल सोडणे अशक्य असल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर स्पष्ट केले.

जलद गाडय़ांच्या थांब्याने प्रवासी सुरक्षा धोक्यात?

दिव्यात जलद गाडय़ा थांबल्यास प्रवासी सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. डोंबिवली स्थानकातील प्रवाशांनाच जलद गाडय़ांमध्ये चढायला जागा नसते. या गाडय़ा डोंबिवलीहून खच्चून भरून दिवा येथे थांबणार आहेत. ठाणे आणि दिवा येथे जलद गाडय़ांचे प्लॅटफॉर्म एकाच बाजूला येणार आहेत. त्यामुळे ठाण्याला उतरणाऱ्या प्रवाशांचा लोंढा डोंबिवलीपासून दाराजवळच थांबलेला असतो. त्यात येथील प्रवाशांची भर पडल्यास प्रवाशांमध्येच वादावादी आणि प्रसंगी हाणामारी होण्याचाही संभव आहे. त्यातून अपघातांनाही आमंत्रण मिळू शकते.

दिवा येथून लोकल सुटायला हवी, ही दिवा तसेच कळवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांचीही मागणी आहे. हा कोटय़वधी रुपयांचा खर्च करून ती मागणी पूर्ण होत नसेल, तर मग या सर्वाचा उपयोग काय? दिवा स्थानकात जलद गाडय़ा थांबणार हे स्तुत्य आहेच. पण दिवा लोकलची मागणीही पूर्ण व्हायला हवी.

– नंदकुमार देशमुख, उपनगरीय प्रवासी एकता महासंघ.