मद्यपान करून भरधाव वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या तरुणाने नाकाबंदीसाठी उभ्या असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला जोरदार धडक दिली. या धडकेत वर्सोवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी दहिफळे गंभीर जखमी झाले आहेत. वर्सोवा येथे रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
वर्सोवा पोलिसांनी रविवारी पहाटे सातबंगला येथील किटोज कॉटेजजवळ नाकाबंदी लावली होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. परंतु, दुचाकीस्वाराने मोटारसायकल थांबवली नाही आणि बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांच्या अंगावर मोटारसायकल वेगाने गेली.
या धडकेत सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी दहिफळे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर कूपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मोटारसायकलस्वार शाहिद डोंगरकर (१९) या तरुणाला घटनास्थळावरून अटक केली आहे. त्याने मद्यपान केल्याचे पोलिसांनी सांगितले. शाहिद हा डीजे म्हणून काम करतो.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2012 रोजी प्रकाशित
मद्यपी मोटारसायकलस्वाराच्या धडकेत पोलीस जखमी
मद्यपान करून भरधाव वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या तरुणाने नाकाबंदीसाठी उभ्या असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला जोरदार धडक दिली. या धडकेत वर्सोवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी दहिफळे गंभीर जखमी झाले आहेत.
First published on: 17-12-2012 at 02:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunker bike rider hit policeman ijured