आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीने अटक केली आहे. आयसीआसीआय बँक व्हिडीओकॉन केस प्रकरणात ही कारवाई ईडीने केली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता आणि त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला होता असा आरोप त्यांच्यावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Enforcement Directorate (ED) arrests Deepak Kochar, husband of former ICICI Bank MD & CEO Chanda Kochar in connection with ICICI Bank-Videocon case: Enforcement Directorate (ED) officials pic.twitter.com/b86l6Gs2Eh

— ANI (@ANI) September 7, 2020

चंदा कोचर आणि त्यांच्या पतीविरोधात PMLA नुसार ईडीने गुन्हा नोंदवला होता. चंदा कोचर यांनी एमडी आणि सीईओ असताना पदाचा गैरवापर करुन व्हिडीओकॉनला कर्ज मंजूर केलं होतं. या प्रकरणी आज दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांना ईडीने अटक केली.

काय आहे प्रकरण?
चंदा कोचर यांच्यावर त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर केलाया आरोप आहे. आयसीआयसीआय ने व्हिडीओकॉन समूहाला ३ हजार २५० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं.

व्हिडीओकॉन ग्रुपने कर्जाच्या ८६ टक्के रक्कम चुकवली नव्हती. २०१७ मध्ये हे कर्ज NPA मध्ये टाकण्यात आलं

व्हिडीओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांनी २०१० मध्ये न्यू पॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेडला ६४ कोटी रुपये दिले होते.

कोण आहेत चंदा कोचर?
चंदा कोचर यांनी भारतीय बँकिंग क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख बनवली होती. जगभरातल्या बँकिंग सेक्टरमध्ये त्यांचं मोठं नाव झालं होतं. एक मॅनेजमेंट ट्रेनी ते आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ, एमडी असा त्यांचा प्रवास आहे. याच चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed arrests deepak kochar husband of former icici bank md ceo chanda kochar in connection with icici bank videocon case scj
First published on: 07-09-2020 at 21:11 IST