मुंबई : पुण्यातील जमीन घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी के ली. खडसे यांनी मात्र हा तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप ‘ईडी’ कार्यालयात हजर होण्यापूर्वी केला.

‘ईडी’च्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी कि मतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा के लेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्यांवर ‘ईडी’चा तपास सुरू के ला. ईडीने याबाबत गिरीश यांच्याकडे मंगळवारी कसून चौकशी के ली.

मात्र ते चौकशीस सहकार्य करत नसल्याचे सांगून ‘ईडी’ने त्यांना अटक केली. चौकशीदरम्यान ही रक्कम विविध कंपन्यांकडून कर्ज म्हणून घेतल्याचे गिरीश यांनी सांगितले. मात्र तपासादरम्यान ही रक्कम बोगस कं पन्यांच्या माध्यमातून इतरत्र वळवण्यात आली होती, अशी माहिती हाती लागल्याचा दावा ‘ईडी’ने के ला. मात्र, हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा नव्हता, असे खडसे यांनी सांगितले.

नऊ तास चौकशी ईडीने खडसे यांची नऊ तास चौकशी केली. सकाळी ११ च्या सुमारास खडसे ईडी कार्यालयात हजर झाले. रात्री आठच्या सुमारास ते या कार्यालयातून निघाले. आवश्यकता भासल्यास पुन्हा बोलवू, असे ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. भोसरी येथील भुखंडखरेदीबाबत खडसे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. या व्यवहारात त्यांची भुमिका काय होती, हे ईडीने समजावून घेण्याचा प्रयत्न के ला. चौकशीदरम्यान ईडीला अपेक्षित असलेली कागदपत्रे समोर ठेवली, अशी माहिती खडसे यांचे वकील अ‍ॅड. मोहन टेकावडे यांनी माध्यमांना दिली.