कंबाटा एव्हिशनच्या मालकीच्या चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृहाला सील ठोकण्यात आले होते. चित्रपटगृह सुरू असताना प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले होते. यावरून न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला फटकारले. कारवाई करण्याची ही पद्धत नसल्याचे खडसावत चित्रपटगृह, जिम्नॅशियम आणि रेस्तराँ सुरू करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे आता प्रेक्षकांना इरॉस चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहता येणार आहे. कंबाटा एव्हिएशन आणि कर्मचाऱ्यांमध्ये सध्या वेतन आणि अन्य थकीत देणी देण्यावरून वाद सुरू आहे. न्यायालयाने कंपनीच्या मालकीची ही इमारत विकण्याचे आदेश दिले होते. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपट पाहत असताना त्यांना बाहेर काढून चित्रपटगृहाला सील ठोकण्यात आले होते. न्यायालयाने यावर सुनावणी करताना चित्रपटगृह, जिम व रेस्तराँ सुरू करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसिलदारांनी बुधवारी सकाळी इरॉस सिनेमागृह इमारत आणि त्यातील २४ गाळ्यांना सील ठोकले होते. तत्पूर्वी बुधवारी न्यायालयाने इमारतीतील गॅलेक्सी एव्हिएशन कंपनीच्या चार कार्यालयांना ठोकण्यात आलेले सील गुरूवारी सकाळी साडेदहापर्यंत तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले होते.
गेल्या फेब्रुवारीपासून कंपनीने कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही. शिवाय त्यांची अन्य देणीही दिलेली नाही. त्यामुळे न्याय हक्कांसाठी कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे योग्य ठरवत कंपनीच्या मालकीची इरॉस सिनेमा इमारत जप्त करण्याचे आदेश दिले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eros cinema theater seal high court district collector kamabata aviation galaxy aviation
First published on: 19-01-2017 at 13:03 IST