राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार बशीर पटेल यांच्या डोंगरी येथील कार्यालात सफाई कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. उबेदूर रेहमान (२२) असे त्याचे नाव आहे. कौटुंबिक कलहामुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पटेल यांच्या डोंगरी र्मचड रोड येथील कार्यालयात उबेदूर रेहमान हा गेल्या ५ वर्षांपासून साफसफाईचे काम करतो. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता तो नेहमीप्रमाणे कार्यालयात आला. तेथे पंख्याला गळफास लावून त्याने आत्महत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex mlas office boy commits suicide
First published on: 13-09-2014 at 04:44 IST