बर्फाचा गोळा म्हटलं की आपल्याला लाकडी काडीवर गोलाकार चेपलेला किंवा ग्लासमध्ये असलेल्या सिरपमध्ये बुडवून जिभल्या चाटत खाण्याचा रंगीबेरंगी गोळा आठवतो. पण तोच बर्फाचा गोळा तुम्हाला कुणी प्लेटमध्ये दिला तर? ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना? पण खरोखरच हा पदार्थ म्हणजे आपल्या नेहमीच्या गोळ्यापेक्षा एक पाऊल पुढे आणि वेगळा आहे. सध्या वाढलेल्या उकाडय़ावर पोट भरणारा आणि मन तृप्त करणारा जालीम उपायच ठरावा.

कनुभाई नंदानी हे मूळचे गुजरातमधील राजकोटचे. त्यामुळे मुंबईत स्थायिक असूनही राजकोटला सतत ये-जा असे. तिथेच त्यांनी हा प्रकार पहिल्यांदा पाहिला. मुंबईच्या लोकांची खवय्येगिरी त्यांच्या चांगल्याच परिचयाची असल्याने त्यांनी राजकोटहून हा पदार्थ थेट मुंबईत आणला. त्याला वेगळी ओळख प्राप्त करून दिली. १९८८ साली त्यांनी बोरिवलीमध्ये पूजा मलई गोळाची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे प्लेटमध्ये गोळा मिळत असला तरी जवळपास २६ वर्षांपूर्वी मिळत असलेल्या गोळ्यामध्ये आणि आत्ता २०१६ साली मिळत असलेल्या गोळ्यामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत. केवळ सात ते आठ वेगवेगळ्या फ्लेवर्सपासून सुरू झालेला हा मामला आता तब्बल १४०हून अधिक वेगवेगळ्या फ्लेवर्सवर येऊन पोहोचला आहे. त्यामध्येही साधा, मलाई, ड्रायफ्रूट अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनसोबत गोळा तयार करण्याच्या पन्नास वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा आहेत. लोकांना आवडतात असे १९ प्रकार सध्या नियमितपणे मिळत असले तरी ग्राहकांच्या मागणीनुसार हवा त्या फ्लेवर्सचा गोळा येथे बनवून दिला जातो.

gold and silver price incresed during festive sesson
सोने, चांदीच्या भावात वाढ होण्याची कारणे अन् आगामी काळात भाव कमी होणार का? जाणून घ्या…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
boy died after injured in leopard attack, leopard attack in Mandavgan Farata,
बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी चिमुकल्याचा मृत्यू, आईच्या डोळ्यांसमोर मुलावर बिबट्याची झडप
Loksatta anvyarth Ten years in jail on charges of Naxalism G N Death of Sai Baba
अन्वयार्थ: व्यवस्थारक्षणासाठी तरी मानवाधिकार राखा!
The death of firemen at Deolali firing range due to old gun What are the potential hazards at the firing range
देवळाली फायरिंग रेंजवरील अग्निवीरांचा मृत्यू जुनाट तोफेमुळे? फायरिंग रेंजवर कोणते धोके संभवतात?
Pune, young man murder Dhayari, Dhayari,
पुणे : ताटात हात घातल्याने तरुणाचा खून, धायरीतील घटना; पाचजणांविरुद्ध गुन्हा
labor suicide contractor torture
ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराची चाकूने गळा चिरून आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठेकेदार अटकेत
pm modi police no drinking water
Video: मोदींचा दौरा; बंदोबस्तातील पोलिसांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल, चित्रफित व्हायरल

येथे ३० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत गोळ्याची किंमत आहे. कोणताही साधा गोळा ३० रुपयांना आणि मिलेनियम स्पेशल गोळा हा सर्वात महागडा गोळा १५० रुपयांना मिळतो. सर्व गोळ्यांचा आकार हा सारखाच असतो. पण त्यावर टाकले जाणारे सिरप, मलई, मावा, ड्रायफ्रूट्स यामुळे त्याचा आकार आणि वजन दोन्हीही वाढते. म्हणूनच सुरुवातीला १५० ते २०० ग्राम असलेला बर्फाचा गोळा जेव्हा व्यवस्थितपणे तयार होऊन तुमच्या हातात पडतो तेव्हा त्याचे वजन जवळपास ७००-८०० ग्रामपर्यंत वाढलेले असते. यावरूनच त्यामध्ये पडणाऱ्या पदार्थाचा आणि त्यांची प्रत काय असेल याचा अंदाज येईल.

बर्फाच्या गोळ्यावर टाकण्यात येणारे सर्व फ्लेवर्सचे सिरप पावसाळा व हिवाळ्याच्या दिवसांमध्ये एक दिवस आड आणि उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज कनुभाईंचा मुलगा भाविक हा त्यांच्या स्वत:च्या कारखान्यामध्ये तयार करतो. गेल्या १४ वर्षांपासून तो हे काम इमानेइतबारे करत आहे. गोळ्यावर टाकण्यात येणारी मलईसुद्धा दूध आणि माव्याच्या मिश्रणातून रोज तयार केली जाते. त्यासाठी गायीचं ताजं दूध वापरण्यात येतं. मुख्य म्हणजे मलईचा दर्जा टिकून राहावा यासाठी कच्चं दूध न वापरता ते व्यवस्थितपणे गरम करून मगच त्याची मलई तयार करण्यात येते. मलई तयार करताना दुधामध्ये किंवा गोळ्यावर वरून टाकण्यात येणारा सुका मावा गेली २८ वष्रे राजकोटमध्ये ६० वर्षांपासून मावा बनवणाऱ्या अतुलभाइंच्या दुकानातूनच मागवला जातोय, हे विशेष. चांगल्या प्रकारे तयार न झालेल्या कच्च्या बर्फामुळे घशाला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे गोळा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा बर्फही गेल्या १६ वर्षांपासून खास नवी मुंबईवरून बर्फाच्या फॅक्टरीतूनच मागवला जातो.

इथे मिळणारा मलई गोळा आता आइस्क्रीमलाही पर्याय ठरत आहे. पॅकिंग करून ठेवलेल्या आणि महागडय़ा आयस्क्रीमपेक्षा तुमच्यासमोर तयार होणारा गोळा खाण्याला लोकं पसंती देत असल्याचं रोज संध्याकाळी गाडीवर होणाऱ्या गर्दीवरून लक्षात येतं. त्यामुळे वर्षांचे ३६५ दिवस येथे हा गोळा मिळतो. बर्फाचा गोळा हा लगेच वितळणारा पदार्थ असला तरी येथे गोळा पार्सलही दिला जातो. पार्सल देताना बर्फाचा गोळा अधिक कडक तयार केला जातो. जेणेकरून तो लवकर वितळणार नाही. पॅकिंगसाठीही चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकपासून तयार केलेले कंटेनर वापरण्यात येतात. तसंच पार्सल केलेला गोळा फ्रिजरमध्ये ठेवल्यास जवळपास दोन दिवस टिकतो .

गोडव्याचा अति डोस झाल्यास तो परिणाम कमी करण्यासाठी चाट खाल्ल्यावर जशी मसाला पुरी दिली जाते तसंच इथे साध्या बर्फावर चाट मसाला टाकून मसाला बर्फही खायला दिला जातो. रस्त्यावर गोळा विकला जात असला तरी लोकांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी आवर्जून घेतली जाते. गोळा खाऊन गिऱ्हाईकांनी प्लेट कुठेही टाकू नये यासाठी टाकाऊ प्लेटचा वापर न लकरता प्लास्टिकच्या प्लेटचा वापर केला जातो. ती प्लेट एकदा साबणाच्या पाण्याने आणि नंतर तीन वेळा साध्या पाण्याने धुतली जाते.

स्पेशल गोळा कसा तयार होतो?

  • सर्वप्रथम मशीनच्या साहाय्याने बर्फाचा चुरा करून घेतला जातो. तो चुरा एका प्लास्टिकच्या प्लेटमध्ये घेऊन त्याला हाताच्याच साहाय्याने गोलाकार आकार दिला जातो. त्यावर तुम्हाला जो फ्लेवर हवा आहे ते सिरप टाकलं जातं. दूध आणि माव्यापासून तयार केलेल्या मलईचा थर त्यावर चढवला जातो. तुमच्या मागणीनुसार आणि प्रकारानुसार त्यावर सुका मावा आणि काजू, बदाम, पिस्ता, अंजीर इ. ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेट चिप्स टाकून सजावट केली जाते.
  • मिलेनियम स्पेशल मलाई गोळा : एकूण बारा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरपचे फ्लेवर्स यावर टाकले जातात. नंतर मलईचा थर दिला जातो. मग सहा प्रकारच्या ड्रायफ्रूट्सने गोळ्याला सजवलं जातं. हा गोळा चवीला अतिशय गोड असतो.
  • डिलक्स गोळा :  आठ प्रकारचे वेगवेगळे सिरप यावर टाकले जातात आणि त्यावर पाच प्रकारचे ड्रायफ्रूट्स. हा गोळा चवीला थोडा आंबट लागतो.
  • बादशाही गोळा : चॉकलेट, कच्ची कैरी, गुलाब, ब्लॅक करंट असे चार वेगवेगळे फ्लेवर्स यामध्ये असतात. त्यावर मलई, सुका मावा आणि भरपूर काजू असतात.
  • कुठे- पूजा मलई गोळा, राईचुरा सर्कल, चंदावरकर रोड, बोरिवली (पश्चिम). 
  • वेळ- संध्याकाळी ७.३० ते रात्री १२.३०.