डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जमीन देण्याची संसदेत घोषणा झाल्यानंतर आता त्याचे श्रेय घेण्याची रिपब्लिकन नेत्यांची धडपड सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून रामदास आठवले यांनी २३ डिसेंबरला मुंबईत विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहेत, तर आनंदराज आंबेडकर यांची २५ डिसेंबरला महाडमध्ये जाहीर सभा होणार आहे.
इंदू मिलमधील स्मारकासाठी आठ-दहा वर्षांपासून आंदोलने सुरू होती. परंतु ६ डिसेंबर २०११ चे आनंदराज आंबेडकर यांचे आंदोलन निर्णायक ठरले. तर रामदास आठवले यांनी मात्र केंद्र व राज्य सरकारला अमूक तारखेपर्यंत इंदू मिलची जमीन ताब्यात मिळाली पाहिजे, अशी कालमर्यादा घालत कधी जेलभरो, तर कधी मोर्चा अशी आंदोलने केली. त्यांनी हा विषय धगधगता ठेवला. त्याचीही नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय वष्टद्धr(२२९ोद्योग मंत्री आनंद शर्मा यांना दखल घ्यावी लागली. यानंतर आता या यशाचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.