सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येप्रकरणी आज राजीव मसंद यांचा जबाब नोंदवण्यात आला. चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना याप्रकरणी समन्स पाठवण्यात आले होते. आज राजीव मसंद यांचा जबाब या प्रकरणी नोंदवण्यात आला. वांद्रे पोलीस ठाण्यात राजीव मसंद आले होते. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. त्यानंतर गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळात अनेकांचे जबाब याप्रकरणी नोंदवण्यात आले आहेत.

१४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेने सगळं बॉलिवूड हादरलं. मात्र काही दिवसातच सुशांत सिंह राजपूतचा बळी घराणेशाहीमुळे आणि गटबाजीमुळे गेला असेही आरोप सिनेसृष्टीतूनच झाले. अभिनेत्री कंगनाने या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली.

यानंतर या प्रकरणात सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती, संजय लीला भन्साळी, शेखर कपूर यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता या प्रकरणात चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. यासाठी त्यांना काल समन्स पाठवण्यात आलं होतं.