दोन वर्षांत एसटीतील वाहकांकडून एक लाखांहून अधिक अपहार प्रकरणे; ५० लाखांचा दंड वसूल

चालकांबरोबरच एसटीची धुरा ही वाहकांकडेही असते. मात्र ही धुरा वाहणाऱ्या काही वाहकांकडून एसटीची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचे काम केले जात आहे. गेल्या दोन वर्षांत एसटी वाहकांकडून तिकीट व्यवहारात एक लाखांहून अधिक गैरव्यवहार केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. गैरव्यवहार केल्यामुळे वाहकांकडून ५० लाखांपेक्षा जास्त भाडे व दंड वसूल करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणांना आळा बसावा म्हणून एसटीकडून वर्षभरापूर्वी दंडात वाढही करण्यात आली; परंतु त्यानंतरही गैरव्यवहारांना आळा बसलेला नाही.

Embezzlement, Embezzlement of Rs 9 Crore, Embezzlement Provident Fund Exposed, 89 Companies Involved Fraud, Provident Fund Fraud, Provident Fund, Fraud in pune, 89 Companies Provident Fund Fraud,
पुणे : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत भविष्य निर्वाह निधीचा अपहार; बनावट कागदपत्रांद्वारे नऊ कोटी रुपयांची फसवणूक
Akola Cyber Fraud , Scammers Use District Collector s Photo, Extort Money, scammers open fake WhatsApp account, district collector fake account, use district collector s photo to Extort Money, akola cyber crime, cyber crime news,
अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून ‘सायबर फ्रॉड’, नागरिकांकडे पैशांची मागणी
ED Attaches Assets, more than Rs 73 Crore, patra chawl fraud case, pravin raut assests, Links to Sanjay Raut, marathi news, mumbai news, ed attaches pravin raut assests, ed, sanjay raut patra chawl, pratra chawl sanjay raut
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून ७३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, खासदार संजय राऊत यांचे विश्वासू प्रवीण राऊत यांच्या मालमत्तांचा समावेश
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात

एसटी महामंडळात जवळपास ३५ हजार वाहक सेवेत आहेत. तिकीट देताना त्यात गैरप्रकार करण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे एसटी महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. यात एखादा वाहक दोषी आढळल्यास महामंडळ त्यांच्याकडून तिकिटाची रक्कम व दंड वसूल करते. एसटीच्या मार्ग तपासणी पथकांनी गेल्या दोन वर्षांत तिकीट व्यवहारात अपहार केल्याची तब्बल १ लाख ०६ हजार ७१० प्रकरणे उघडकीस आणली आहेत. २०१५-१६ मध्ये ५५ हजार ७१० गैरव्यवहार प्रकरणांची नोंद होती. २०१६-१७ मध्ये ५१ हजार प्रकरणे दाखल झाली आहेत. २०१६-१७ मध्ये दाखल झालेल्यांमध्ये प्रवासभाडे वसूल करून तिकीट न देणे, प्रवास भाडे पूर्ण वसूल करून कमी दराचे तिकीट देणे, वापरलेली तिकिटे पुन्हा प्रवाशांना देणे, कमी रोकड सापडणे व जादा रोकड सापडणे इत्यादींचा समावेश आहे.

५१ हजार प्रकरणांमध्ये नाशिक विभागात सर्वात जास्त १८ हजार ७३८ गैरव्यवहार प्रकरणे झाली आहेत. त्यानंतर पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या विभागांचा क्रमांक लागतो. या प्रकरणांना आळा बसावा यासाठी वर्षभरापूर्वी एसटी महामंडळाने वाहकांसाठीच्या असणाऱ्या दंडात वाढ केली होती. तिकिटाची रक्कम किंवा त्याच्यावर एक हजारपट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

२०१५-१६ मध्ये २५ लाख ९२ हजार ३८६ रुपये भाडे व दंडवसुली करण्यात आली, तर २०१६-१७ मध्ये हाच आकडा २४ लाख २५ हजार ५७८ रुपये इतका आहे.

सुट्टय़ा पैशांचे गणित

एसटी महामंडळाकडून कामगिरीवर जाणाऱ्या वाहकाकडे १०० रुपये सुट्टे पैसे देण्यात येतात. विकण्यात आलेल्या तिकिटांची रक्कम व सुट्टे पैसे यापेक्षा जास्त रक्कम किंवा कमी रक्कम आढळल्यास अशा वाहकावर कमी रोकड सापडणे किंवा जादा रोकड सापडणे याअंतर्गत कारवाई केली जाते.

अफरातफरीचे प्रकार

इतर प्रकरणांमध्ये मालवाहतुकीचे तिकीट शुल्क ठरलेले असतानाही तिकिटांची रक्कम कमी आकारणे, कमी अंतरासाठी जादा तिकीट आकारणे, ओळखीच्यांना तिकीट देऊन त्याचे पैसे न घेणे इत्यादी प्रकरणे येतात.

दंडामध्ये वाढ

प्रवास भाडे वसूल न करण्याची एकूण ६,९८५ प्रकरणांची नोंद २०१६-१७ मध्ये आहे. विनातिकीट प्रवास केलेल्या प्रवाशांची प्रकरणे यात येतात. विनातिकीट प्रवाशांना पूर्वी १०० रुपये दंड होते. आता हाच दंड २०० रुपये करण्यात आला. यात चालकाचाही निष्काळजीपणा दिसून येत असल्याने प्रवासी व चालकालाही दंड केला जातो.

टोल फ्री क्रमांक

परीक्षेसंदर्भात काही तांत्रिक अडचण असल्यास १८००१२१८४१४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.

,५४८ जागांसाठी १ लाख ३८ हजार उमेदवार

मुंबई: एसटी महामंडळाकडून लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) पदासाठी ऑनलाइन परीक्षा ७ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहे. या पदाच्या २,५४८ रिक्त जागांसाठी १ लाख ३८ हजार अर्ज महामंडळास प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर व १४ नोव्हेंबर रोजी राज्यामधील विविध ५४ केंद्रांवर ३ सत्रांत घेण्यात येईल. सकाळी ९ ते १०.३०, दुपारी १२.३० ते २ आणि सायंकाळी ४ ते ५.३० वाजेपर्यंत परीक्षा होईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

सर्व उमेदवारांना लघु संदेश, ई-मेलद्वारे परीक्षा स्थळ, परीक्षेची वेळ व तारीख आसन क्रमांकही पाठवण्यात आला आहे. उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली

आहे. ज्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्राच्या पसंती क्रमांकाव्यतिरिक्त इतर ठिकाणी परीक्षा केंद्र मिळाले होते, अशा १८ हजार उमेदवारांना त्यांच्या राहत्या विभागात अथवा जवळच्या विभागात एसटी महामंडळाकडून परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले.