कल्याणमधील शिवाजी चौकातील शिवम रुग्णालयातील डॉ. मनू लोखंडे यांनी रुग्णालयातील एका ५९ वर्षीय ज्येष्ठ परिचारिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून, बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. लोखंडे हे खडकपाडा येथील मोहन हाईट्समध्ये राहतात. त्यांचे शिवाजी चौकात शिवम रुग्णालय आहे. बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास डॉ. लोखंडे यांनी ज्येष्ठ परिचारिकेला आपल्या रुग्ण तपासणीच्या खोलीत बोलावून तिचा हात पकडला. सदर परिचारिकेने त्यास प्रतिकार केला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.