कुल्याबातील ताज महाल हॉटेलजवळच्या ‘चर्चिल चेंबर’ या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. आगीचे नेमके आणि अधिकृत कारण कळू शकलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेरिवेदर रोड येथील ‘चर्चिल चेंबर’ला लेवल-२ ची आग लागल्याचा कॉल मिळाल्यानंतर अग्निशमनचे जवान बंबांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. आगीमुळे तिसऱ्या मजल्यासह बाजूच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणावर धूर साठला होता तसेच या मजल्यावर ६ ते ७ लोक अडकले होते. यांपैकी एका ५४ वर्षीय व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. तर इतर २ जणांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित लोकांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरु आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire breaks out on the 3rd floor of churchill chamber building near taj mahal hotel in colaba aau
First published on: 21-07-2019 at 13:41 IST