मालाडमध्ये लक्ष्मी चाळ परिसरात गोदामाला आग

मालाड पश्चिमेला असलेल्या एका चाळीच्या परिसरात बुधवारी सकाळी आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मालाड पश्चिमेला असलेल्या एका चाळीच्या परिसरात बुधवारी सकाळी आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मालाड पश्चिमेला असलेल्या लक्ष्मी चाळीच्या परिसरात असलेल्या एका गोदामाला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाचे पाच बंब आणि पाण्याचे चार टॅंकर घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. आगाची कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
(संग्रहित छायाचित्र) 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fire in chawl at malad west area of mumbai