तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) होणाऱ्या चौकशीसाठी हजर झाले आहेत. डीआरडीओ गेस्ट हाऊसवर अनिल देशमुख यांची चौकशी होणार असून सीबीआय अधिकारीदेखील पोहोचले आहेत. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी सीबीआयकडून समन्स बजावण्यात आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशमुखांच्या सीबीआय चौकशीचा मार्ग मोकळा

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याकाठी १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा दावा सिंह यांनी पत्रात केला. तसंच देशमुख हे पोलीस कामकाजातही सतत ढवळाढवळ करत होते, असेही त्यांनी पत्रात नमूद केलं होतं.

याप्रकरणी परमबीर यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात याचिकाही केली. सिंह यांच्या पत्राचा हवाला देत अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने सीबीआयला दोन आठवड्यांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांना झटका दिल्यानंतर सीबीआय तपासाला वेग; टीम NIA कार्यालयात दाखल

प्राथमिक चौकशीसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या सीबीआयच्या विशेष पथकाने आतापर्यंत सिंह, अ‍ॅड. पाटील, वाझे, साहाय्यक आयुक्त संजय पाटील, पश्चिाम उपनगरांतील बार मालक महेश शेट्टी यांच्यासह प्रकरणाशी संबंधित अन्य काहींचे जबाब नोंदवून घेतले आहेत. बुधवारी देशमुख यांच्याकडे हे पथक चौकशी करणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former home minister of maharashtra anil deshmukh cbi drdo guest house sgy
First published on: 14-04-2021 at 10:11 IST