मुंबईत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील चार वर्षीय आराध्याला सूरतमधील एका १४ महिन्याच्या मेंदू मृत मुलाच्या अवयवदानातून ह्रदय मिळाले. मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात ही ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली.

आराध्याची प्रकृती एप्रिल- २०१६ ला बिघडली. विविध वैद्यकीय तपासणीत तिला ह्रदयाचा गंभीर आजार असल्याचे निदान झाले. तज्ज्ञ डॉक्टरांनी आराध्याची स्थिती बघत ह्रदय प्रत्यारोपण हा एकच पर्याय असल्याचे स्पष्ट केले. हे ह्रदय कमी वयाच्या मेंदू मृत मुलाचेच असणे आवश्यक होते. त्याकरिता आराध्याचे वडील योगेश मुळे आणि डॉक्टरांकडून देशाच्या विविध रुग्णालयांत मेंदू मृत मुलाचा शोध सुरू झाला. दरम्यान आराध्यावर उपचार सुरू होते. गत दीड वर्षांत आराध्याला २० वेळा उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान गुजरातमधील सुरतच्या एका रुग्णालयात १४ महिन्याच्या मुलाचा मेंदू मृत झाल्याचे कळले.

अवयवदानाकरिता नातेवाईकांना डॉक्टरांनी समुपदेशन केले. मंजुरी मिळताच दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये चर्चा झाली. मेंदू मृत मुलगा आणि आराध्याच्या डीएएन जुळताच ह्रदय प्रत्यारोपन शक्य असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी डॉक्टरांनी योगेश मुळे यांच्याशी संपर्क करीत आराध्याला रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान सुरतमधून मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयापर्यंत ग्रीन कॅरिडोर करून ह्रदय आणण्याची व्यवस्था केली गेली. ह्रदय मुंबईला पोहोचताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तातडीने आराध्यामध्ये ह्रदय प्रत्यारोपीत केले. तिची प्रकृती गंभीर असली तरी काही तासांनी प्रत्यारोपणानंतरची खरी स्थिती कळणार आहे.

समाजमाध्यमांवर जनजागृती

आराध्याला ह्रदयाचा आजार असल्याने ह्रदय प्रत्यारोपणाचाच पर्याय तिच्यासमोर जगण्यासाठी होता. यासाठी विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी फेसबूक, ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांवर अववदानाच्या जनजागृतीसाठी आवाहन करत जनजागृती अभियान राबवले. त्यात गुजरातच्या डोनेल लाईफ या सामाकि संघटनेचाही सहभाग होता. अखेर आराध्याला ह्रदय मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four year old aaradhya heart transplant surgery at fortis hospital
First published on: 06-09-2017 at 02:07 IST