देवनार येथे आपल्या सहकाऱ्याची हत्या करून फरारी झालेल्या आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. मोहन चौरसिया असे या आरोपीचे नाव आहे. देवनार येथील एका रसवंतीगृहात चौरसिया आणि शमशेर अन्सारी हे दोघे काम करत होते. चौरसियाला गावी जायचे होते. त्यासाठी त्याने मालकाकडे पैसे मागितले होते. परंतु मालकाने पैसे न दिल्याने त्याने दुकानात चोरी करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या शुक्रवारी रात्रीच्या वेळी तो दुकानातून चोरी करत असताना अन्सारीने त्यास विरोध केला.यावेळी झालेल्या भांडणातून चौरसियाने अन्सारीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर चौरसिया उत्तर प्रदेशात आपल्या गावी पळून गेला होता. देवनार पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2012 रोजी प्रकाशित
सहकाऱ्याची हत्या करणाऱ्यास उत्तर प्रदेशातून अटक
देवनार येथे आपल्या सहकाऱ्याची हत्या करून फरारी झालेल्या आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. मोहन चौरसिया असे या आरोपीचे नाव आहे. देवनार येथील एका रसवंतीगृहात चौरसिया आणि शमशेर अन्सारी हे दोघे काम करत होते. चौरसियाला गावी जायचे होते.
First published on: 30-11-2012 at 02:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendes murderer arrested in uttar pradesh