मुख्य तेल उत्पादक सौदी अरेबियाच्या दिलाशाने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमध्ये उतार नोंदला गेला असतानाच याचा फायदा भारताला झाला आहे. भारतात सलग सातव्या दिवशी पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली असून डिझेलचे दर मात्र स्थिर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी सलग सातव्या दिवशी पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोल आठ पैशांनी तर दिल्लीत नऊ पैशांनी स्वस्त झाले. तर डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. बुधवारी मुंबईत पेट्रोल ८६. ७३ रुपये दराने मिळत असून डिझेल ७८. ४६ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल ८१. २५ रुपये आणि डिझेल ७४. ८५ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. मुंबईत गेल्या सात दिवसांमध्ये पेट्रोल १ रुपये ५७ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलचे  दर ८५ पैशांनी कमी झाले आहेत.

दरम्यान, इराणवरील अमेरिकेमार्फत लादले जाणारे निर्बंध ४ नोव्हेंबरपासून अमलात येत आहे. या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने इंधन पुरवठ्याबाबत आश्वस्त केल्याचा दिलासा किमतीतील फरकातून दिसला आहे. खनिज तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतातही पेट्रोल व डिझेलच्या उत्पादनावरील खर्चातही घट झाली आहे.याचा लाभ तेल कंपन्या ग्राहकांना देत आहेत.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर खालील प्रमाणे (प्रतिलिटरनुसार)
पुणे
पेट्रोल- ८६. ५२ रुपये
डिझेल – ७७. ०२ रुपये

औरंगाबाद
पेट्रोल – ८७. ७७ रुपये
डिझेल – ७९. २५ रुपये

नागपूर
पेट्रोल – ८७. २१ रुपये
डिझेल – ७८. ९९ रुपये

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuel price petrol rate cut seventh straight day diesel prices same mumbai pune nagpur iocl
First published on: 24-10-2018 at 06:52 IST