मुंबई-आग्रा मार्गावर कसारा बायपासजवळील साईखिंड परिसरात घरगुती वापराच्या एलपीजी टॅंकरमध्ये स्फोट झाल्याने एक जण ठार, तर एक जण जखमी झाले. या घटनेत एलपीजी टॅंकर जळून पूर्णपणे खाक झाला असून, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी, एक कंटेनर मुंबईहून नाशिककडे चालला होता. त्याला एलपीजी टॅंकरने मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याचा सुमारास मागून धडक दिली. यानंतर सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास टॅंकरमध्ये छोटा स्फोट होऊन त्याला आग लागली. पोलिसांनी अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंकडील वाहतूक रोखून धरली होती. टॅंकरला आग लागल्यानंतर खासगी अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. टॅंकरचा चालक आगीमध्ये जळाला असल्याची माहिती मिळाली आहे. 
(संग्रहित छायाचित्र) 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas tanker blast on mumbai agra highway near kasara bypass
First published on: 18-06-2013 at 10:42 IST