गुगल कायमच आपल्या युजर्ससाठी नवनवीन योजना जाहीर करत असते. युजर्सच्या दैनंदिन जीवनातील तक्रारी दूर व्हाव्यात हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. नुकतेच गुगलने आपले एक नवे अॅप्लिकेशन सुरु केले असून या ऍपमुळे शेजाऱ्यांकडून स्थानिक स्तरावरची महत्वाची माहिती मिळणार आहे. बीटा व्हर्जन असलेले नेबर्ली हे ऍप ऍन्ड्रॉईड ४.३ आणि त्याहून सरस असणाऱ्या सर्व स्मार्टफोनमधील गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येणार आहे. मागच्या काही काळापासून लोक आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त झाल्याने त्यांचा शेजाऱ्यांशी म्हणावा तितका संपर्क नसतो. मात्र शेजाऱ्यांना ते जिथे राहतात तेथील अदययावत आणि अचूक माहिती असते. त्यामुळेच लोकांना स्थानिक प्रश्न विचारता यावेत आणि त्यांची उत्तरे सहज उपलब्ध व्हावीत या हेतुने या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेबर्ली लोकांना त्यांच्याकडे असलेले ज्ञान इतरांसोबत वाटण्यास आणि शेजार सुरक्षित ठेवण्यास मदत करणार आहे. गुगलच्या नेक्स्ट बिलीयन युझर्स टीमचे समूह उत्पादन व्यवस्थापक जोश वुडवर्ड यांनी सांगितले की, “वेबवरील माहितीद्वारे लोकांना एकमेकांसोबत जोडण्यासाठी गुगल सर्चची सुरुवात झाली. नेबर्लीच्या साहाय्याने हेच मिशन आम्ही वैश्विक स्तरावर नेत आहोत. यामुळे लोकांना वेबवरची माहिती मिळविणे सोपे होते.

गुगलने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सर्वसामान्य व्यक्ती त्याचे आयुष्य त्याच्या घराच्या १ किलोमीटर परिसरातच जगतो. आपल्या शेजाऱ्यांकडून अंतर्गत सामूहिक ज्ञानाचे लाभ शेजाऱ्यांना मिळावेत हा नवीन अनुभव आम्हाला निर्माण करायचा होता. आणि जर तसं घडलं तर आम्हाला आशा आहे की खऱ्या अर्थाने शेजारधर्म निर्माण होईल.” सध्या ही सुविधा मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली असून येत्या काळात ती महाराष्ट्रातील आणि भारतातील इतर शहरातही सुरु करण्यात येणार आहे.

असा घ्या अॅपचा फायदा

१. शेजाऱ्यांना प्रश्न विचारता येतील – तुम्ही विचारलेला प्रश्न जो मदत करु शकेल अशा योग्य त्या तज्ज्ञ शेजाऱ्याकडे पाठविला जाईल. आपण शेजाऱ्यांशी बोलतो त्याप्रकारे युजर्स गुगलच्या व्हॉईस रिकग्निशनचा वापर करुन इंग्रजीसह आठ अन्य भारतीय भाषांमध्ये शेजाऱ्याला प्रश्न विचारु शकतो.

२. स्थानिक तज्ज्ञ बना- उजवीकडे आणि डावीकडे प्रश्न स्वाईप करा आणि उत्तरे द्या. सर्वात जास्त मदत करणाऱ्या शेजाऱ्याला अॅप कडून काही बक्षिसही देण्यात येणार आहे.

३. शेजारधर्म सुरक्षित ठेवा- कोणतीही खाजगी माहिती न देता ब्राऊज करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. नेबर्ली वापरताना फोन नंबर, संपूर्ण नाव आणि इतर संपर्क माहिती गुप्त ठेवण्यात येते. नेबर्ली वापरणाऱ्या प्रत्येक सदस्याला शेजारधर्म सभ्यपणे पाळणे आणि मदतीसाठी तत्पर ठेवण्याचे ‘नेबर्ली प्रॉमिस’ अर्थात वचन द्यावे लागते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Googles new neighbourly app will answer all your local queries
First published on: 31-05-2018 at 18:05 IST