पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला खटल्यातील एकमेव आरोपी हिमायत मिर्झा बेग याने उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानवरील सुनावणीस सोमवार, १२ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. बेगने शिक्षेविरोधात केलेले अपील आणि त्याला झालेल्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठीचे प्रकरण या दोन्हींवर न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी सुरू आहे. वास्तविक गुरुवापासूनच या सुनावणीस सुरुवात होणार होती. मात्र बेगचे वकील गैरहजर राहिल्याने सुनावणी सोमवापर्यंत तहकूब केली. सुरक्षेच्या कारणास्तव बेगला ‘व्हिडिओ कॉन्फरन्िंसग’द्वारे हजर करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.