मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवार सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून, रस्ते वाहतूक आणि लोकल सेवा खोळंबली आहे. दादर, लोअर परळ, वरळी भागात जोरदार पाऊस पडत असून ठिकठिकाणी ट्राफीक जामच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वांद्रे, माहिम, सांताक्रुझ या उपनगरांत देखील मुसळधार पाऊस पडत आहे. जेव्हीएलआरवर ‘एल अॅंड टी’जवळ टेम्पो बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. रस्ते वाहतुकीपाठोपाठ लोकल सेवा देखील रखडली आहे. मध्य रेल्वेची सेवा तब्बल अर्धा तास उशीराने सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ठाणे-कळवा दरम्यान लोकलमध्य तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in mumbai road and train transport disturb
First published on: 01-07-2016 at 11:50 IST