दहा वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या चौघांना चिरडणारा अभिनेता सलमान खान याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालविल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या खटल्याला शुक्रवारी सत्र न्यायालयात सुरुवात झाली. सलमान स्वतः या सुनावणीसाठी शुक्रवारी न्यायालयात हजर होता. 
सदोष मनुष्यवधाच्या कलमाखाली खटला चालविण्याला सलमानच्या वकिलांनी सुनावणीवेळी विरोध केला. मात्र, सरकारी वकिलांनी सलमानवर लावण्यात आलेले सदोष मनुष्यवधाचे कलम योग्य असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. सुनावणीवेळी सुमारे १५ मिनिटे सलमान आरोपीच्या पिंजऱयात उभा होता.
सलमानच्या दोन बहिणी सुनावणीवेळी न्यायालयात हजर होत्या. सुमारे तासभर खटल्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाचे कामकाज तहकूब करण्यात आले. याप्रकरणी पुढील सुनावणी २४ जुलैला होणार आहे.