शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवार २७ नोव्हेंबर रोजी षण्मुखानंद सभागृहात सर्वपक्षीय सभा होणार आहे. या श्रद्धांजली सभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय अपारंपरिक ऊर्जामंत्री फारुख अब्दुल्ला, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रिपब्लिकन नेते रामदास आठवले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपाचे उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच बजाज उद्योग समूहाचे राहुल बजाज, उद्योगपती श्रीचंद हिंदुजा, ‘रिलायन्स’चे उपाध्यक्ष सतीश सेठ, शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे आदी विविध क्षेत्रांतील नामवंत उपस्थित असतील. षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी ६ वाजता श्रद्धांजली सभा सुरू होईल. तळमजल्यावर विविध पक्षांचे नेते, ठाकरे कुटुंबीय व महिलांसाठी आसनव्यवस्था ठेवण्यात आली आहे.