उपोषणाला पाच दिवस उपोषण उलटूनही राज्य सरकार मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने होमिओपॅथीक डॉक्टर सोमवारी मंत्रालयावर मोर्चा नेणार आहेत. महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समितीच्या सदस्यांनी गेल्या सोमवारपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले. मात्र सरकार लक्ष देत नसल्याने संस्थेचे राज्य समन्वयक डॉ. विजय पवार वगळता इतरांनी उपोषण रद्द केले. आता ते मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत़