रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होताच आपले सामान घेऊन पळणाऱ्या मदन जयस्वाल (४०) या फळविक्रेत्याचा शुक्रवारी सांताक्रूझ येथे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू ओढवला. त्याला व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.  
सांताक्रूझ येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी दिले होते. या परिसरात सातत्याने फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असते. जयस्वालच्या मृत्यूनंतर फेरीवाल्यांनी देसाई रुग्णालयाबाहेर ढोबळे यांच्याविरोधात घोषणा दिल्या.